टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनामुळे देशानेच नाही तर मानवतेने एक दयाळू नेता गमावला आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
With the passing away of Ratan Tata sir, not just India, but humanity has lost a compassionate leader.
A business tycoon who also excelled at philanthropy.I will always remember him, not just for his commitment to business and philanthropy, or only for his compassion for…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 9, 2024
”रतन टाटा सर यांच्या निधनाने फक्त हिंदुस्थाननेच नाही तर मानवतेने एक दयाळू नेता गमावला आहे. ते अत्यंत मोठ्या मनाचे एक बलाढ्य उद्योगपती होते. व्यावसायिक बांधिलकी, परोपकारी वृत्ती, प्राण्यांसाठी असलेलं प्रेम फक्त यासाठीच नाही तर जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा पाहिलेली त्यांच्यातली मानवता यासाठी ते कायम माझ्या स्मरणात राहतील. अशा व्यक्ती विरळच… देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.