
मुंबईकर शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे का उभे राहतात याची प्रचीती लगेचच येऊ लागली आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल लागताच शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक लोकांच्या सेवेत रुजू झाले आहेत. प्रभाग क्रमांक 54चे नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये न रमता कामाला सुरुवात केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पांडुरंग वाडी, नाईकवाडी, सेंट थॉमस, संत रोहिदास नगर, गोगटेवाडी, राम नगर, हनुमान नगर, सीता नगर येथील लोकांनी अंकित प्रभू यांच्यापुढे कमी दाबाने येणारे पाणी व दूषित पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या होत्या. अंकित प्रभू यांनी यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पी उत्तर विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेत पाहणी दौरा केला. यावेळी उपविभागप्रमुख सुधाकर देसाई, शाखाप्रमुख अजित भोगले, विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर, प्रसाद कदम, धोपटकर, डॉ. गावस्कर, किशोर देशपांडे, संजय शानबाग, राजेंद्र गाड, अमित आडेलकर, सुधीर देवरुखकर, रामदत्त पारकर, भूषण राजाध्यक्ष, नंदू गाड, दीपक पवार, सुर्वे, मसुरकर, खाडे, विलास खाडये आदी उपस्थित होते.
पाणी समस्येवर झटपट तोडगा
प्रभू यांनी आज पी उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता बी.जी. परब, नितीन ठाकूर, अनिकेत पाटील यांच्यासमवेत पाहणी दौरा केला. या वेळी पाण्याच्या पाईपमध्ये कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून दूषित पाणी कसे व कुठून येते हे कळू शकणार आहे. तसेच राम नगर, हनुमान नगर व सीता नगर येथे कमी दाबाने येत असलेल्या पाण्याची पाहणी केली. त्या परिसरातील पाण्याचे प्रेशर वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.




























































