
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीची तारीख पडली आहे. या सुनावणीवेळी न्यायदेवतेचे अतंरात्मा जागा होतो का आणि संविधानाची किती बूज राखली जाते का, हे आपल्याला समजणार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितल. दोन दिवसात युक्तीवाद पूर्ण करून निकाल द्यावा, या न्यायमुर्तींच्या मताचे आम्ही स्वागत करतो, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही याचिका दाखल केल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच चिन्ह आणि पक्षाबाबत निकाल येणे, अपेक्षित होते. आमचेच चिन्ह आम्हाला मिळायला हवे होते. मात्र, अत्यंत बेकायदेशीपणे मिंधे यांच्या बेकायदेशीर पक्षाला चार महत्त्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या, हे संविधानविरोधी आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष कुण्यातरी ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देणे, हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमानआहे, असे त्यांनी सांगितले.
पालघर हा महाराष्ट्राचा अविभाज्या भाग आहे. मात्र, बुलेट ट्रेन, वाढवण बंदराच्या निमित्ताने हा भाग बाजूच्या राज्याला मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा नकाशा जाहीर करावा. हे प्रकरण गंभीर असल्याने राज्यातील या सर्व प्रकरणावर चर्चा करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.






























































