
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हापरिषद गटाची निवडणूक लक्षवेधी ठरत असून या जिल्हा परिषद गटात सध्यातरी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुग्धा जागुष्टे यांचे पारडे जड दिसत असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात शिंदे गट- भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात लढत असून शिवसेनेच्या मुग्धा जागुष्टे यांचे पारडे जड असून त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गणाच्या निवडणूकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपा- शिवसेना शिंदे गट यांच्यातच खरी लढत होणार असून सर्व पक्षिय उमेदवारांचा प्रचार जोरदारपणे सुरु झाला आहे. कोसुंब जिल्हापरिषद निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. तालुक्यातील सर्वात लक्षवेधी व रंगतदार लढाई ही कोसुंब गटात होणार आहे. ही लढत चौरंगी असुन लक्षवेधी ठरत आहे.
संगमेश्वर तालुक्यात महायुती असली तरी या गटात भाजप व शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाचे नेते माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र युवा नेते व जि प माजी अध्यक्ष रोहन बने व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव तर शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिप माजी सदस्या मुग्धा जागुष्टे यांच्यात लढत होणार असली तरी भाजप व शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत असल्याने या लढतीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुग्धा जागुष्टे या बाजी मारणार असे चित्र पाहायला मिळत आहे.
आता संगमेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिंदे गटात आणि भाजपा मधे मैत्री पुर्ण लढत होत असल्याने युतीची मते विभागणार आहेत. या मत विभाजनाचा फायदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उमेदवार मुग्धा जागुष्टे यांना होणार असुन जागुष्टे यांच्या पाठीशी शिवसेनेचे जेष्ठ नेतृत्व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या सारखा चाणक्य असल्याने मुग्धा जागुष्टे यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याची शिवसैनिकांची भावना आहे.
या गटात गत वेळी निवडणुकीत भाजपाचे अधटराव यांनी ४६४६ मते तर शिंदे गटाचे रोहन बने यांनी ४९६८मते मिळवत निसटता विजय मिळविला होता. या गटात आता समीकरणे बदलली आहेत. माजी मंत्री रवींद्र माने हे प्रचाराची रणनिती आखत असल्यामुळे शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ताकद वाढली आहे. सर्व सामान्य मतदारांचा कल हा मुग्धा जागुष्टे यांच्याकडे दिसत असल्याने मुग्धा जागुष्टे यांचा लाभ होण्याचीच जास्त शक्यता असल्याने दिसत आहे.



























































