भंडारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भंडारा जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

शहरप्रमुखपदी अशोक चुटे (भंडारा शहर), शंकर भुरे (पवनी शहर), चंद्रभान वानखेडे (लाखांदूर शहर), विजय पाटील (तुमसर शहर), नारायण निखारे (मोहाडी शहर), महेश पोगळे (साकोली शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.