शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस तसेच शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना विभाग क्र. 1 तर्फे बोरिवली, दहिसर, मागाठाणे विभागात उद्या, रविवारी सकाळी 9 ते 1 या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिराचे आयोजन विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी केले आहे.
बोरिवली विभागातील रक्तदान शिबीर गोराईच्या सेंट रॉक्स शाळा, दहिसर पूर्व विभागातील शिबीर शैलेंद्र विद्यालय आणि मागाठाणे विधानसभेतील रक्तदान शिबीर कांदिवलीच्या समता नगर विद्यालय येथे संपन्न होणार आहे. या शिबिरात सुमारे दोन हजार युनिट रक्त जमवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रक्तदात्यांनी मोठय़ा संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.