
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता-भगिनींचे अश्रू अद्याप सुकलेले नसतानाच मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडला आहे. देशवासीयांचा प्रचंड विरोध असतानाही अबुधाबीमध्ये हिंदुस् थान-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या रणरागिणींनी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘माझं कुंकू माझा देश’ हे आंदोलन छेडून घराघरातून आलेले कुंकू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले.
ठाणे पाचपाखाडी येथील चंदनवाडी शाखेत शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, जिल्हा संघटक रेखा खोपकर, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहरप्रमुख अनिश गाढवे, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी, विधानसभा संघटक प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, विद्या कदम, स्मिता इंदुलकर, अनिता प्रभू, पुष्पालता भानुशाली, योगिता नाईक, नीलिमा शिंदे, माधुरी ठाकरे, स्नेहल सावंत, ज्योती पाटील, शोभा गरांडे, अंकिता पाटील, उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, विजय देसाई, संजय तरे, प्रदीप शिंदे, सचिन पाटील, प्रकाश मोहिते, विजय कदम, सचिन चव्हाण, वसंत गव्हाळे, राजेंद्र महाडिक, चंद्रकांत विधाटे, संजय ब्रीद, प्रमिला भांगे, मंदार विचारे आदी उपस्थित होते.
कल्याण कोळसेवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर महिला आघाडीने जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शहर संघटक मीना साळवे, उपशहर संघटक सुनिता ढोके, संगीता गांधी, नलिनी कदम, मुक्ता घुगे, संगीता साजणे, आशा सावंत, तेजस्वी पाटील, शहर युवाधिकारी निरज कुमार, कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील, अंबनाथ उपजिल्हाप्रमुख अशोक म्हात्रे, प्रकाश जाधव, विभागप्रमुख सचिन राणे, गणपत घुगे, आत्माराम डिगे आदी सहभागी झाले होते.
अलिबाग शहरातील भाजपच्या कार्यालयासमोर जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि जिल्हा संघटक शिल्पा घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोल न छेडण्यात आले. या आंदोलनात उपजिल्हा संघटक दर्शना पाटील, तालुका संघटक तनुजा पेरेकर, मुरुड तालुका संघटक राजश्री मिसाळ, अलिबाग उपतालुका संघटक लीना घरत, अलिबाग शहर संघटक राखी खरवले, चौल ग्रामपंचायत माजी सरपंच रूपाली म्हात्रे, मुरुड विभाग संघटक मनाली पाटील आदी सहभागी झाल्या होत्या.
डोंबिवली शहरातील इंदिरा चौकात जिल्हा संघटक वैशाली दरेकर राणे यांच्या नेतृतवाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोल नात कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, भय्या पाटील, शहर संघटक अक्षरा पटेल, प्रियंका विचारे, विधानसभा संघटक सुप्रिया चव्हाण, रेश्मा सावंत, विभाग संघटक वैखरी साळुंखे, रिचा कामतेकर, उपशहर संघटक निशा रेडीज, सुरेखा सावंत, अर्चना पाटील, प्रिया दानगे, प्रियंका पाटील, जयश्री जोशी, विमल गोडसे, वंदना बेलेकर, स्मिता पाटील, राजेंद्र सावंत, सुरेश परदेशी, संजय मांजरेकर, संजय पाटील, सचिन जोशी, परेश पाटील, आदित्य पाटील, ऋतुनील पावसकर, विनायक वराडकर, तुषार नाईक, संदीप नाईक, शहर अध्यक्ष राहुल कामत, अरुण जांभळे, प्रेम पाटील, ऋषिकेश गवळी, सरोज भोईर आदी सहभागी झाले होते.
भाईंदर शहरात जिल्हा संघटक नीलम ढवण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, उपजिल्हा धनेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत सावंत, विधानसभा संघटक सुप्रिया घोसाळकर, हेमलता जोशी, उपजिल्हा संघटक कांचन लाड, प्राची पाटील, स्वाती देसाई, जयलक्ष्मी सावंत, शहर संघटक श्रेया साळवी, शिवानी देसाई, मनीषा भोपळे, कल्पना शिगवण, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा संपर्क संघटक ज्योत्स्ना दिघे, जिल्हा संघटक डॉ. स्वीटी गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी तालुका संघटक वर्षा कालप, शहर संघटक तृप्ती रत्नपारखी-पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
नवी मुंबई वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे आणि जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शन करण्यात आली. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकणीं, शत्रुघ्न पाटील, मनोज इसवे, संतोष घोसाळकर, रवींद्र म्हात्रे, सुनील गव्हाणे, शहरप्रमुख विशाल ससाणे, उपजिल्हा संघटक विनया मढवी, उषा रेनके, बसुदा सावंत, रेश्मा वेंगुर्लेकर, शुभांगी रावखंडे, वैजयंती म्हात्रे, मंदाकिनी गुंजाळ, गौरी पवार, संगीता तांबोळी, नलिनी डवले, पूनम आगवणे, सीमा सकपाळ, रुखिया शेख आदी सहभागी झाले होते.
पेण शहरातील कोतवाल चौकामध्ये उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे आणि जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, जगदीश ठाकूर, उपतालुकाप्रमुख संतोष पाटील, तालुका सहसंपर्कप्रमुख भगवान पाटील, दर्शना जवके, महानंदा तांडेल, चेतन मोकल, तुकाराम म्हात्रे, योगेश पाटील, नामदेव पिंगळसकर, समीर पाटील, ईश्वर शिंदे, कांचन थळे, अनंत पाटील, गुरू थवई, राजश्री घरत, वैशाली समेळ, धन्वंती दाभाडे, मनीषा भोईर, अर्चना पाटील, नेत्रा घरत, शमा म्हात्रे, सुरेखा पाटील, नीलिमा म्हात्रे, सुवर्णा कुथे, मनीषा भोईर आदी सहभागी झाले होते.
वसई नालासोपारा पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात लोकसभा संघटक भावना किणी, जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, भाविका पाटील, जिल्हा युवती अधिकारी भक्ती दांडेकर, उपजिल्हा संघटक नयना वर्तक, भारती गावडे, तालुका संघटक प्रभा सुर्वे, अंजेला तांडेल, विधानसभा संघटक रेश्मा सावंत, संगीता सुर्वे, शहर संघटक, जसिंथा पिंच, संगीता भोईर, चरणा म्हात्रे, रुचिता विश्वासराव, पावित्रा चंदा, वंदना नांदवीकर, शीला लष्करे, उपशहर संघटक माधुरी शेटे, शिल्पा वालकर, शैला बेर्डे, वैशाली पालव, भाग्यश्री वैद्य, रश्मी ताबडे, सुजाता कदम आदी सहभागी झाल्या होत्या.