लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसह महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून मिळवलेल्या विजयाचा आनंद शिवसैनिकांच्या चेहऱयावरही झळकत होता. भगवे उपरणे, छातीवर बाळासाहेबांचा पह्टो असलेला बॅच, हातात शिवबंधन आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत शिवसैनिक माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये प्रवेश करत होते. वर्धापन दिनासाठी शिवसैनिकांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून गर्दी करायला सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मुंबई, डोंबिवली, ठाणे, वाशीसह राज्यभरातून शिवसैनिकांचे भगवे वादळ षण्मुखानंदमध्ये अवतरले होते. माटुंगा परिसरासह सभागृहाच्या चारही बाजूला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारे फलक, भगवे झेंडे लागले होते. हिंदू शिवसैनिकांसह मुस्लिम, शीख शिवसैनिक उपस्थित होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला होता. सभागृहही शिवसैनिकांनी खचाखच भरले होते.
n लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे सर्व विजयी शिलेदार आणि लढवय्या योद्धय़ांचा यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
n लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे, पद्मावती शिंदे, युवासेना पदाधिकारी, भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आणि षण्मुखानंद हॉलच्या व्यवस्थापनाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि तिरंगा झेंडा देऊन सत्कार करण्यात आला.