
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अंगिकृत संघटना शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शिवसेना भवन, दादर येथे आज 4 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5. वाजता शिवसेना उपनेत्या व माजी महापौर सौ. विशाखाताई राऊत यांच्या हस्ते मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा मुंबईतील दादर येथील ‘शिवसेना भवन’ मध्ये तिसऱ्या मजल्यावर आयोजित केला आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी सुरू होणाऱ्या या कायदेशीर केंद्राच्या उद्घाटनावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड.नितिश सोनवणे, उपाध्यक्ष (प्रभारी) ॲड.स्वप्ना कोदे, सरचिटणीस ॲड.मनोज कोंडेकर, चिटणीस ॲड. सुमित घाग, चिटणीस ॲड. दर्शना जोगदनकर, समन्वयक ॲड.भूषण मेंगडे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) ॲड. कोजल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने वकील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.