मेघवाडीच्या सिलिंडर स्फोटातील कुटुंबाला शिवसेनेची मदत

लालबाग येथील मेघवाडीत मंगळवारी झालेल्या सिलिंडर स्फोटातील राणे कुटुंबीयांच्या मदतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. शिवसेना गटनेते, आमदार अजय चौधरी यांनी तत्काळ भेट घेऊन राणे कुटुंबीयांना आमदार निधीतून मदत मिळवून दिलीच, पण त्याचबरोबर उद्ध्वस्त झालेल्या घराची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी म्हाडा प्रशासनाला आदेश दिले. दरम्यान, घराच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

लालबागमधील मेघवाडीत बिल्डिंग नंबर 2 मध्ये 30 जुलैला घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. रूम नंबर 26 मध्ये राहणाऱया राणे कुटुंबीयांच्या घरात हा स्फोट झाला. यात 4 जण जखमी झाले. यात दोघा लहान मुलांचा समावेश आहे तर कुंदा राणे (48) यांचा मृत्यू झाला. स्फोटामुळे घर पूर्णपणे मोडकळीला आले.

आमदार अजय चौधरी यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ प्रत्यक्ष भेट दिली आणि घराची दुरुस्ती करण्यासाठी आमदार निधी दिला. त्याचबरोबर घराची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना म्हाडा प्रशासनाला दिल्या.