मतदान हक्क यात्रेमुळे जनतेला नवी आशा, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या मतदान हक्क यात्रेत संजय राऊत सामील होणार

बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये मतदान हक्क यात्रा काढली आहे. या यात्रेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, मी आज पाटणा येथे होणाऱ्या मतदान हक्क यात्रा मध्ये श्री राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत सहभागी होणार आहे. ही आपल्या देशातील लोकशाही वाचविण्यासाठीची एक अनोखी चळवळ आहे. यामुळे देशभरात जागृती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रानेदेखील डोळ्यांसमोरच मतचोरी अनुभवली आहे. मोदी आणि त्यांच्या पक्षाने मतं चोरून सत्तेत प्रवेश केला. आणखी किती काळ आपण हे सहन करणार? मतदान हक्क यात्रेने जनतेला नवी आशा दिली आहे, असे प्रतिपादनही संजय राऊत यांनी केले.