बदलापूरच्या संतापजनक घटनेवरून मुंबईत आज शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. मिंधे-फडणवीस सरकारचा धिक्कार करत शिवसैनिकांनी धडक आंदोलन केले. दादरमध्ये शिवसेना भवनासमोर तसेच गिरगाव, लालबाग, चेंबूर, मुलुंड येथे शिवसैनिकांनी संतप्त निदर्शने केली. आरोपीला फासावर लटकवा, गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. काळ्या पट्टय़ा बांधून, तोंडाला काळ्या पट्टय़ा बांधून अनेक शिवसैनिक या आंदोलनात उतरले. काळे झेंडे फडकावत सरकारविरोधी घोषणा देत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.
बदलापूर येथे चिमुरडय़ांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना विभाग क्रमांक 10च्या वतीने शिवसेना भवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
(बोरीवली)
राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात मिंधे सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी विभाग क्र. 1 च्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले होते. माजी आमदार विलास पोतनीस, संजना घाडी यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
(घाटकोपर)
ईशान्य मुंबई शिवसेना विभाग क्र. 8 चे विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पृष्णा पाटील व विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. बदलापूरच्या क्रूर घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागणीसह सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेतील सर्व महिला, पुरुष शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, अंगीपृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच विभागतील नागरिक उपस्थित होते.
(लालबाग )
शिवसेना शिवडी विधानसभेच्या वतीने भारतमाता, लालबाग येथे जनआंदोलन करण्यात आले. ‘लाडक्या बहिणींच्या मुलीवर अत्याचार… बरखास्त करा महायुती सरकार’, ‘निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना विभाग क्रमांक 11 मधील सर्व पदाधिकारी आणि लालबागकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या आक्रोश आंदोलनाचे नियोजन उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांनी केले होते
(गिरगाव )
शिवसेना विभाग क्रमांक 12 च्या वतीने गिरगाव ठापूरद्वार नाका येथे गृहमंत्री फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजपुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर, जयश्री बळ्ळीकर, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, गणेश सानप, राजू पह्डकर, मिनल जुवाटकर, सुरेखा उबेळा, विशाखा पेडणेकर, करुणा गीध, गायत्री अवळेगावकर, सुनील कदम, उद्य बने, उपविभागप्रमुख संपत ठापूर, पृष्णा पवळे, बाजीराव मालुसरे, सुरेंद्र निगुडकर, दिलीप सांवत, समीर कडलक, शोभा जगताप, सरिता तांबट, वीणा दौंडकर, लतिका पाष्टे, कल्पना सुर्वे, विकास आडुळकर, पायल ठापूर उपस्थित होते
(शिव कोळीवाडा)
चिमुकलींवर अत्याचार करणाऱया नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करत शिवसेना विभाग क्र. 9 च्या वतीने आंदोलन करण्यात आले. विभागप्रमुख प्रमोद शिंदे, शीव-कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विभाग संघटक पद्मावती शिंदे, विधानसभा संघटक-माजी नगरसेविका अंजली नाईक, माजी नगरसेविका निधी शिंदे, स्मिता गावकर, ऋतुजा तारी, विधानसभा संघटक नीलम डोळस, श्रीकांत शेटये, अनिल पाटणकर, रामदास कांबळे, शशिकांत पाटील, विधानसभा संघटक संजय नटे या आंदोलनात सहभागी झाले होते.
(मुलुंड)
शिवसेना मुलुंड विधानसभेच्या वतीने शाखा क्रमांक 104 व 106 येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी विधानसभा प्रमुख नंदिनी सावंत, उपविभागप्रमुख दिनेश जाधव, सीताराम खांडेकर, नितीन चवरे, उपविभाग संघटक हेमलता सुकाळे, कवीता शिर्पे, सुनीता धोंगडे, विधानसभा संघटक यशोदा चंदनशिवे, रूपाली सुभेदार, संचिता देठे, पुष्पा अनपढ, रंजना काळे, शीला सोनवणे, शाखा संघटक सुजाता इंगावळे, प्राजक्ता साळवी, प्रमिला घाणेकर, संगीता टेमकर, सायली सावंत, लता चोपा, योगिता रांजोळी, शाखाप्रमुख राजेश साळी, अमोल संसारे, संजय जाधव, चंद्रकांत शेलार, शैलेश पवार, आनंद पवार उपस्थित होते.