
या सरकारचं करायचं काय.. खाली डोकं वर पाय, आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, कुपोषण थांबवा, प्यायला पाणी द्या.. हाताला काम द्या अशा गगनभेदी घोषणा देत विविध मूलभूत हक्कांसाठी आज शिवसेनेने जबरदस्त एल्गार पुकारला. पालघर जिह्याच्या वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने महामोर्चा काढण्यात आला. डोक्यावर तळपते ऊन.. पायाला बसलेले चटके आणि घशाला पडलेली कोरड.. अशाही परिस्थितीत शिवसेनेच्या मोर्चामध्ये मोठय़ा प्रमाणावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाने पालघर जिल्हा अक्षरशः दणाणून गेला. आदिवासींच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय नाही दिला तर शिवसेना स्टाईलने यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे आदिवासी बहुल तालुके अजूनही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या, कुपोषण, बालमृत्यू, पाणीपुरकठा योजनेमध्ये भ्रष्टाचार, अपुऱया योजना, रस्त्यांकरील खड्डे, बेरोजगारी, भारनियमन, प्रलंबित कन हक्क दाके, अपुऱया आरोग्य सुकिधा, शिक्षणाची दूरवस्था अशा असंख्य समस्यांनी पालघर जिह्याला गेल्या अनेक वर्षांपासून ग्रासले आहे. सरकारने कोटय़वधी रुपये खर्च करूनही अनेक योजना अर्धवट अवस्थेत आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमकार पाटील यांच्या पुढाकाराने आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
या महामोर्चामध्ये शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व माजी आमदार विलास पोतनीस, सहसंपर्कप्रमुख विकास मोरे, गिरीश राऊत, प्रथमेश राऊत, उपजिल्हाप्रमुख दिलीप मोहोडकर, किक्रमगड तालुकाप्रमुख प्रमोद पाटील, काडा तालुकाप्रमुख निलेश पाटील, मोखाडा तालुकाप्रमुख दिलीप बांडे, किक्रमगड शहरप्रमुख मनोज खरपडे, मोखाडा शहरप्रमुख किकी लोखंडे, सौरभ अहिरे, उपतालुकाप्रमुख भाऊ तेलंगे, महिला आघाडी संघटक कैष्णकी क्यापारी, जक्हार तालुका संघटक चित्रांगण घोलप, जक्हार उपशहरप्रमुख साईनाथ नकले, निलेश फलटणकर, जिल्हा युकाअधिकारी अभिषेक जाधक, पालघर उपशहरप्रमुख लक्षित भोईर आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालघरचे निकासी जिल्हाधिकारी सुहास भागडे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निकेदन दिले.
… तर सरकारला सळो की पळो करून सोडू
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार, कुपोषण हे प्रश्न महत्त्वाचे असून आदिवासी बांधवांची पुढची पिढी चांगली घडवायची असेल तर आपल्याला सरकारविरुद्ध लढाई लढावीच लागेल. येथील प्रश्नांची सरकारला व प्रशासनाला जाणीव नाही. ग्रामीण भागात अजूनही वीज व पाणी आलेले नाही. आरोग्याच्या यंत्रणेचे तीनतेरा उडाले आहेत. पालघरमधील आदिवासींच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष द्या नाही तर सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी दिला. शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख ओमकार पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टींचा समन्वय साधला तरच येथील आदिवासी टिकणार असून शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
महिलांचाही सहभाग; गणपती, मारुती, नरसिंहाच्या वेशात मोर्चेकरी
सूर्य आग ओकत असतानाही वाडय़ा–वस्त्यांवरील आदिवासी बांधव सकाळपासूनच मोर्चासाठी पालघरमध्ये आले होते. त्यात महिलांही मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. भगव्या टोप्या, भगवे झेंडे आणि सरकारचा निषेध करणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्याशिवाय गणपती, मारुती, नरसिंह यांच्या वेशातील मोर्चेकरी हे मोर्चाचे प्रमुख आकर्षण ठरले.




























































