वेस्ट इंडिजच्या खेळाडूने तोंडाला लगाम घालावा , भास्कर जाधव यांचा जबरदस्त टोला

वेस्ट इंडीजच्या खेळाडूने त्याच्या तोंडाला लगाम घालावा, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

“एका वृत्तवाहिनीने भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची तुलना वेस्ट इंडीजच्या खेळाडूशी करताच बावनकुळे यांना राग येतो. मग बावनकुळेंसह फडणवीस यांना इतरांवर बोलताना काहीच वाटत नाही का?’ असा सवाल करीत, वेस्ट इंडीजच्या या प्लेयरच्या तोंडाला लगाम घालावा, असा टोला जाधव यांनी बावनकुळेंना लगावला. ‘होऊ द्या चर्चा’ या उपक्रमाअंर्तगत येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर जाधव पत्रकार परिषदेत बोलत होते.