
मुंबई – कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकात जाणाऱया प्रवाशांच्या सोईसाठी येथील स्कायवॉक थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जोडण्याचे काम सुरू आहे. या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेले पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शिवडी-काळाचौकी प्रभागाचे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पूल विभागाच्या अधिकाऱयांसोबत कामाची पाहणी केली आणि पुढील काम लवकरात लवकर करण्याची सूचना केली. तसेच रस्त्यावर अडथळा ठरणारे बॅरिकेड्स, लोखंडी परात तत्काळ हटवण्याच्या सूचना दिल्या. हा पूल प्लॅटफॉर्मला जोडण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वेची परवानगी मिळवून देण्यासाठी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी पाठपुरावा केला होता.
एक्सप्रेसच्या डबलडेकर कोचला भीषण आग
मुंबई – पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या मेल एक्सप्रेसच्या डबलडेकर कोचला भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अधिक भडका उडू नये म्हणून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. काही कालावधीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सुपरस्टार विजयच्या रॅलीत महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू
सेलम – राजकारणात पदार्पण केलेला सुपरस्टार विजय पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. तामीळनाडू येथील सेलमच्या रॅलीत महाराष्ट्रातील 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तामीळनाडूतील सेलम येथे तमिलगा वेत्री कझगम पक्षाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विजयने या रॅलीसाठी हजेरी लावली होती. यावेळी सूरज नावाच्या तरुण खाली कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला.






























































