बाबुडीमुळे माझे मन भरून आले आहे! श्रद्धा कपूरने लिहिले मराठीतून पत्र

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या चाहत्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र तिने चक्क मराठीतून लिहिले असल्याने मराठी भाषिकांनी तिचे तोंडभरून कौतुक केलं आहे. ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोअर्स झाल्याचा आनंद झाल्याने श्रद्धाने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने म्हटलंय की

“माझ्या सर्व प्रिय gems, बाबुडी, फॅन क्लब आणि हितचिंतकांनो. मी तुमच्या प्रेमाद्वारे बनवलेले व्हिडीओ आणि पोस्टस पाहिल्या आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे आज येथे आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम, असेच सुखी राहा आणि आनंदी राहा. कृपया तुमची स्वत:ची काळजी घ्या आणि एकमेकांशी प्रेमाने रहा, धन्यवाद…. धन्यवाद….. धन्यवाद…… 50 मिलिअन वेळा- श्रद्धा “

श्रद्धाने पत्र मराठी लिहिल्याने काही जणांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. एकाने श्रद्धाला प्रश्न विचारलाय की मराठीमध्ये लिहिलं नसतं तर तुला कोणी सुळावर चढवलं नसतं

या व्यक्तीला श्रद्धाच्या मराठी भाषिक फॅन्सने तिथेच झापत सडेतोड उत्तर दिलंय.

श्रद्धाच्या दुसऱ्या एका चाहत्याने तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मराठी अभिनेते आणि अभिनेत्री या मराठीतून बोलण्यास संकोच करतात आणि तुम्ही मराठीमधून पोस्ट करत सर्वांचे मन जिंकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या