
अंतराळवीर आणि वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्रने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गॅलेंट्री पुरस्कार आणि सेवा पदक विजेत्यांची नावे जाहीर केली. तीन जणांना कीर्ती चक्र आणि 13 जणांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात येणार आहे.
लष्कराचे मेजर अर्शदीप सिंग, नायक सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि वायुदलाचे ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर यांना कीर्ती चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लष्करातील ले. कर्नल आदित्य घाटगे, मेजर अंशुल बाल्टू, मेजर शिवकांत यादव, मेजर विवेक, मेजर दीपक सिंह, कॅ. योगेंदर सिंह ठाकुर, सुभेदार पी. एच. मोझेस, सैनिक मंगलेम संग वैफेई, धुर्व ज्योती दत्त, नौदलाचे ले. कमांडर दिलना के. ले., कमांडर रूपा ए आणि केंद्रीय गृहमंत्रालयातील सहायक कमांडंट विपीन विल्सन यांना शौर्य चक्र जाहीर करण्यात आला आहे. सैनिक बलदेव चंद यांना मरणोपरांत शौर्य चक्र जाहीर करण्यात आला आहे.




























































