
हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशु शुक्ला सोमवारी म्हणजेच 14 जुलै 2025 ला पृथ्वीवर परतणार आहे. अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाने ही माहिती दिली.
ऑक्सिओम-4 मिशन अंतर्गत शुभांशु शुक्ला यांच्यासह चार देशाचे चार अंतराळवीर अंतराळात पोहोचले. या मिशनला 25 जूनला फ्लोरिडाच्या कॅनेडी स्पेस सेंटरहून लाँच करण्यात आले होते. 28 तासांचा प्रवास केल्यानंतर 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर डॉक केले होते. हे मिशन 14 दिवसांचे होते. परंतु, चार दिवस वाढल्याने आता हे अंतराळवीर सोमवारी पृथ्वीवर परतणार आहेत. ऑक्सिओम मिशन 14 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार, सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी आयएसएसपासून वेगळे होईल. या मिशनद्वारे चार अंतराळवीर अंतराळात गेले होते. यामध्ये कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), पायलट शुभांशु शुक्ला (हिंदुस्थान), मिशनचे तज्ञ स्लावोस्ज उज्नान्स्की-विश्विस्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगरी) या चौघांचा समावेश आहे. हे मिशन केवळ वैज्ञानिक प्रयोगासाठी आहे. तर हिंदुस्थान, पोलंड आणि हंगरी यांच्यासाठी पहिले सरकारी प्रायोजित अंतराळ मिशन आहे.
ड्रॅगन कॅप्सूलची माघारीची प्रक्रिया
ड्रॅगन पॅप्सन जे स्पेसएक्सने बनवले आहे. ते 14 जुलै 2025 ला भारतीय वेळेनुसार, 4.35 वाजता आंतरराष्ट्रीय स्टेशनपासून वेगळे होईल. त्या ठिकाणचे हवामान आणि तांत्रित स्थिती कशी आहे, यावर वेळ मागे-पुढे होऊ शकते. कॅप्सूल पृथ्वीच्या दिशेने जाईल. समुद्रात सुरक्षित लँडिंग केले जाईल. या ठिकाणाहून टीमला सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल.
ऑक्सिओम-4 मिशनसाठी 548 कोटी
ऑक्सिओम-4 मिशनमध्ये हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे सहभागी आहेत. या मिशनच्या एका जागेसाठी हिंदुस्थानने 548 कोटी रुपये मोजले आहेत. हे एक खासगी स्पेस फ्लाइट मिशन आहेत. हे मिशन अमेरिकन स्पेस कंपनी ऑक्सिओम, नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्तपणे केले जात आहे. ही कंपनी आपल्या स्पेसक्राफ्टने खासगी अंतराळ प्रवाशांना अंतराळात पाठवण्याचे काम करते.