शुभमन गिल आणि रिद्धीमा पंडित अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने केला खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्या जोड्या नेहमीच चर्चेचा विषय असतात. यामध्ये सध्या टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल नेहमीच टॉप लिस्टवर असतो. गेल्या काही महिन्यांपासून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनबद्दल सर्वत्र चर्चा होती. मात्र आता टीव्ही अभिनेत्री रिद्धीमा पंडितसोबत शुभमन गिल विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता यावर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.

टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. गेल्या काही दिवसांपासून शुभमन आणि रिद्धिमा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. पण त्याला आपले लग्न गुप्त ठेवायचे आहे, या अफवा व्हायरल होताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सत्य उघड केले. आपल्या लग्नाच्या चर्चा निरर्थक असल्याचे अभिनेत्रीने म्हटले.

रिद्धिमाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.यामध्ये तिने शुभमनसोबतच्या लग्नाबाबत भाष्य केले. ‘या सगळ्या अपवा आहेत. अशा गोष्टींना काहीही तथ्य नाही. आज मला माझ्या लग्नाबद्दल अनेक पत्रकारांच्या कॉल्सने जाग आली. पण लग्न कुणाचं? मी लग्न करत नाही आणि माझ्या आयुष्यात असा क्षण कधी आला तर मी स्वत:तुम्हाला सांगेन, असेही रिद्धिमाने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by India Forums (@indiaforums)

शुभमन गिलसोबत सारा तेंडलकर तसेच सारा आली खान यांची नावे जोडली जातात.शुभमन सारा अली खानला शुभमन डेट करत असल्याचे म्हटले जात होते.मात्र, शुभमन गिल अथवा सारा तेंडुलकर किंवा सारा अली खानकडून याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही.