परीक्षा केंद्रावर शीख महिलेचा अपमान; ‘दुमाला’ पगडी उतरवण्यास लावली, तणावानंतर केंद्र प्रशासनाने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sikh woman asked to remove turban at exam centre

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका अमृतधारी शीख महिलेला परीक्षा केंद्रावर सुरक्षेच्या कारणास्तव पगडी उतरवण्यास सांगितल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (MPPSC) वतीने आयोजित परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला.

रविवारी परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या एका शाळेत ही घटना घडली. उपलब्ध माहितीनुसार, गुरलीन कौर या अमृतधारी शीख महिलेला तपासणीदरम्यान तिची ‘दुमाला’ (पगडी) उतरवण्यास सांगण्यात आले होते.

ही बाब स्थानिक शीख समुदायाला समजताच मोठ्या प्रमाणात समाजबांधव परीक्षा केंद्राबाहेर जमा झाले. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आपला संताप व्यक्त केला.

या घटनेनंतर समुदायाचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. अखेर उपविभागीय दंडाधिकारी (SDM) प्रतीक सोनकर आणि केंद्र प्रमुख सुभाष कुमावत यांनी शीख समुदायासमोर या घटनेबद्दल जाहीर खेद व्यक्त केला आणि माफी मागितली. प्रशासनाने माफी मागितल्यानंतर दोन्ही बाजूंनी हा वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले.

पीडित महिला गुरलीन कौर ही राजस्थानमधील चित्तोडगडची रहिवासी आहे. ती परीक्षेसाठी एक दिवस आधीच आपल्या नातेवाईकांकडे रतलामला आली होती आणि रविवारी दुपारी परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचली होती.

sikh-woman-asked-to-remove-turban-at-exam-centre-in-madhya-pradesh-controversy

a controversy erupted in madhya pradesh’s ratlam after an amritdhari sikh woman was asked to remove her turban at mppsc exam centre. officials later apologized to the community. updates on saamana.

Keywords: saamana, samana, samna, daily saamana, दैनिक सामना, सामना, sikh woman turban controversy, madhya pradesh news, mppsc exam ratlam, sikh community protest, marathi news updates.