आठवडाभरात चांदी 22 हजार रुपयांनी महागली

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात भरमसाट वाढ होत आहे. सोन्याची झळाळी दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु, चांदीलाही सोन्याचे दिवस आले आहेत. अवघ्या एका आठवडय़ात चांदी तब्बल 22 हजार रुपयांनी महाग झाली आहे. चांदीच्या किंमतीत लक्षनीय वाढ झाल्याने चांदीने दीड लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवडय़ात चांदी प्रति किलो 1 लाख 45 हजार रुपये होती. ती आता 1 लाख 77 हजार रुपये इतकी झाली आहे. डॉलरच्या मूल्यातील चढउतार आणि सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीमुळे सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय, केंद्रीय बँकांकडून होणारी खरेदी आणि सुरक्षित मालमत्ता म्हणून गुंतवणूकदारांचा सोन्याकडे असलेला रस हेदेखील या वाढीला कारणीभूत ठरत आहेत. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 45,363 ने वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76,162 होती, जी आता 1,21,525 वर पोहोचली आहे.

वाढता वाढता वाढे

3 ऑक्टोबर    –                1,45,610 रुपये

4 ऑक्टोबर    –                1,55,000 रुपये

5 ऑक्टोबर    –                1,55,000 रुपये

6 ऑक्टोबर    –                1,56,000 रुपये

7 ऑक्टोबर    –                1,57,000 रुपये

8 ऑक्टोबर    –                1,60,000 रुपये

9 ऑक्टोबर    –                1,67,000 रुपये

10 ऑक्टोबर –                1,74,000 रुपये

11 ऑक्टोबर –                1,77,000 रुपये