
मिरची ताजी ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी मिरची धुऊन घ्या आणि नंतर ती पूर्णपणे कोरडी करा. मिरचीचे देठ काढून टाका, हा मिरची ताजी ठेवण्यासाठी चांगला उपाय आहे. मिरचीला पेपर टॉवेल किंवा सुती कापडात गुंडाळून ठेवा.
गुंडाळलेल्या मिरच्या हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. जर तुम्हाला जास्त काळ मिरची साठवायची असेल तर ती फ्रीजरमध्ये ठेवा. मिरचीला एअर टाईट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. असे केल्याने मिरच्या जवळपास एक महिन्यापर्यंत ताज्या राहतात.