
चेंदवण येथील बिडवलकर हत्या प्रकरणातील पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा असलेला सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या मोबाईलसह अन्य सहा मिळून एकूण सात मोबाईल पोलिसांनी संशयिताकडून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील पाचही संशयितांची 5 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बिडवलकर खून प्रकरणातील पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा असलेला सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल संशयित सिद्धेश शिरसाट याने अमोल शिरसाट यांच्याकडे दिला होता, तो मोबाईल अमोल शिरसाट यांच्या कुडाळ येथील घरातून पोलिसांनी हस्तगत केला असून त्यासह अन्य सहा मोबाईल मिळून सात मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.