सिंधुदुर्गातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली घोषणेची पूर्ती

723

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात 29. 53  चौ.कि.मी क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसुचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेबुवारी महिन्यात सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा केली होती. वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझमचा प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार आता हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित झाले आहे.

या क्षेत्राचा समावेश

दोडामार्ग वन परिक्षेत्रातील या संवर्धन राखीवसाठी बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे खु. केंद्रे बु.  पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे,  हेवाळे,मेढे या गावातील काही क्षेत्राचा  समावेश करण्यात आला आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर

तिलारी संवर्धन राखीव हा महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर स्थित आहे. गोव्यातील म्हादेई अभयारण्य, कर्नाटकातील भिमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन हे तीन क्षेत्र वन्यप्राण्यांच्या दृष्टीने विशेषतः वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतील.

जैवविविधता जपणार

राज्याचा विकास करतांना राज्याच्या वन वैभवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विकास आणि वन्यजीवाच्या अधिवासाचे तसेच जैवविविधतेचे रक्षण या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असून राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याला सरकारचे प्राधान्य राहील-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विपुल प्राणी- वनसंपदा

sindhudurg, tilari, reserve, forest, uddhav, thackeray

. याप्रमाणेच विविध प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर समृद्ध आहे. वन्यजीवांचा हा अधिकास संरक्षित होण्याच्यादृष्टीने या परिसराला संवर्धन राखीक घोषित करणे गरजेचे होते.  सोमवारी जारी झालेल्या अधिसुचनेद्वारे त्यास मान्यता मिळाली असून आता जैकविविधता जपतांनाच या क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या