‘या अली’ फेम प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचे निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झाला अपघात

हिंदुस्थानमधील प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करत असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र झुबीन गर्ग यांच्या अकस्मित मृत्युमुळे देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

52 वर्षीय झुबीन गर्ग हे सिंगापूरला एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. 20 व 21 सप्टेंबरला एका कार्यक्रमात ते परफॉर्म करणार होते. 19 सप्टेंबरला ते समुद्रात स्कुबा डायव्हिंग करायला गेले. मात्र तिथे काहीतरी असे घडले ज्यात झुबीन गर्ग यांचा मृत्यू झाला. समुद्रकिनाऱ्यावरील बचाव पथकाने गर्ग यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मूळचे आसामचे असलेले झुबीन हे इम्रान हाश्मी याच्यावर प्रदर्शित झालेल्या या अली या गाण्यामुळे जगभरात प्रसिद्ध झाले होते. त्यांनी तब्बल 40 भाषांमध्ये गाणी गायली आहेत.