
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वेवरील शीव उड्डाणपुलाचे चार टप्प्यांत होणारे काम सध्या वेगाने सुरू असून हा पूल जुलैमध्ये वाहतुकीसाठी सज्ज होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पुलाच्या कामातील दोन भुयारी मार्गांमधील एका भुयारी मार्गाचे काम सध्या पूर्ण झाले असून तो पुढील 15 दिवसांत पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्गाचे काम पालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्राr मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करावी. पश्चिमेकडील अधिकाधिक भाग कामासाठी उपलब्ध व्हावा, असे नियोजन करावे, असे निर्देश बांगर यांनी प्रशासनाला दिले. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वेशी योग्य समन्वय साधावा, असे निर्देशही त्यांनी दिले.



























































