
लग्नसमारंभाहून परतत असताना दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, छत्तीसगडमधील कांकेर राष्ट्रीय महामार्गावरील नथिया नवगावजवळ गुरुवारी रात्री ही घटना घडली. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर कांकेर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व मयत चरमा ब्लॉकमधील उडाकुडा गावचे रहिवासी होते. सर्व कांकेर विकास ब्लॉकमधील चिवराज गावात एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या गाडीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला धडक बसली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


























































