
मणिपूरमध्ये सुरक्षा दलाने तीन जिह्यांतून सहा नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. बंदी घातलेली संघटना पीपूल्स लिबरेशन आर्मच्या तीन सक्रिय सदस्यांना तेंगनौपाल जिह्यातून अटक केली. तर पीपुल्स रिवोल्यूशनरी पार्टी ऑफ कांगलीपाकच्या एका सदस्याला इन्फाळ पश्चिम जिह्यातून ताब्यात घेतले. कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी-मीयामगी फिंगांग लानमीच्या एका सदस्याला इम्फाळमधून अटक केली. या संघटनेवरही बंदी घातलेली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जातीय हिंसाचारानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. मे 2023 मध्ये झालेल्या हिंसाचारात 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोक बेघर झाले होते.


























































