मत्स्यालयातून शार्क मासा चोरला, बाबागाडीत भरून पळवून नेला

58

सामना ऑनलाईन, सॅन अँटोनिओ

अमेरिकेतील टेक्सास भागात एक विचित्र चोरी उघडकीस आली आहे. इथल्या मस्त्यालयातून एक १६ इंची शार्क चोरून नेण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध झालं असून यामुळे ही चोरी कशी झाली ते तुम्हाला कळेल. पुढील बातमी वाचण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा

दृश्यात दिसणाऱ्या व्यक्तीने हा शार्क ज्या पाण्याच्या टाकीत होता, त्यात हात घालून तो उचलला. या चोराचा एक साथीदारही होता ज्याच्या मदतीने त्याने हा शार्क एका कापडात गुंडाळला. शार्क मस्त्यालयातून पळवून नेण्यासाठी या चोरांना बाबागाडी आणली होती. शार्कला बाबागाडीत ठेऊन हे चोर त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचले, मात्र तोपर्यंत मस्त्यालयातील कर्मचाऱ्यांना शार्क चोरल्याचं कळालं होतं. त्यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज बघत पार्कींग तळावर धाव घेतली आणि या दोघांना अडवलं. गाडीच्या झडतीमध्ये शार्क मासा आढळून आला असून तो जिवंत असल्याने मस्त्यालय कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. या शार्कची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार डॉलर्स इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या