
नागपूर विमानतळाबाहेर आज शिवसैनिकांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना इंगा दाखवला. शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, नितेश राणे हाय हाय…कोंबडीचोर मुर्दाबाद…अशा घोषणा देत शिवसैनिकांनी विमानतळाबाहेरचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे नितेश राणे यांची पळताभुई थोडी झाली.
नितेश राणे नागपूर विमानतळावर दाखल झाले तेव्हा तिथे भाजपचे 10-12 कार्यकर्तेच उपस्थित होते तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन होणार असल्याने मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. नितेश राणे विमानतळावर उतरल्याची कुणकुण लागताच शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे नितेश राणे यांची गाळण उडाली. त्यानंतर पोलिसांनी राणे यांना दुसऱ्या मार्गाने विमानतळाच्या बाहेर काढले व कारमध्ये बसून त्यांनी पळ काढला.
दरम्यान, खऱ्या शिवसैनिकांचा जोश काय असतो हे आज दिसले. नितेश राणे शिवसेना नेत्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये करत सुटले आहेत. त्याविरोधातील हा संताप होता, अशी प्रतिक्रिया यावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिली.