नगर जिल्ह्यातील बालविवाह सारखे प्रथेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, नगर जिल्हा प्रशासन आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उडान’ बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाच्या माध्यमातून नगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून, हे अभियान राबवत आहोत.
या अभियाना अंतर्गत नगर जिल्ह्यात ‘माझे गाव बालविवाह मुक्त गाव’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कृतीशील प्रयत्न केले जात आहे. यासाठी येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजीच्या स्वतंत्र दिनानिमित्त होणाऱ्या प्रत्येक गावातील ग्रामसभेमध्ये “बालविवाह प्रतिबंध ठराव” करण्यासाठी उडान प्रकल्पा अंतर्गत 1341 ग्रामपंचायती अंतर्गत असणारे सर्व महसूल 1602 गावांना आणि नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्र देऊन विनंती करण्यात आले आहे. यांनी पण कोणताही विलंब न करता नगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांना आदेश करून सर्व गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक ठराव करून बालविवाह विषयक जनजागृती घडवून आणण्यासाठीचा पुढाकार घेतला आहे. ही मोहीम राबवण्यासाठी उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, आणि स्नेहालय चे संचालक. हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम,शोशल वर्कर,शाहिद शेख, सीमा जुनी, पूजा झिने आणि महाराष्ट्र राज्यातून आलेल्या विविध जिल्ह्यातील स्वयंसेवक श्रीतेज घुगे,शिवम गावंडे,प्रदीप ढोरे,समीर खोडके,पियुष भगत,शितल पिठाले,प्रनोती कोपरकर,गौरव मडुर,मंगल मुन्तोडे,आदित्य केदार,गायत्री बडधे यांच्या अथक परिश्रमाने ही मोहीम यशस्वी झाली.
बालविवाह प्रतिबंध ठराव
1) विवाहपूर्व ग्रामपंचायत कार्यालयात वधू वराच्या जन्म तारखेचे पुरावे जसे की अधिकृत जन्म प्रमाणपत्र / शाळेतून निर्गम उतारा / शाळेच्या अभिलेख सादर करणे बंधनकारक असेल. वयाचे पुरावे मिळाल्यानंतर ग्राम बालविवाह प्रतिबंध समिती याच्याकडून वयाची पडताळणी करून लग्नाची नोंद करण्यात येईल.
2) गावातीत एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह गावात किंवा गावा बाहेर होत/झाला असेल तरीही प्रत्येक विवाहाची गावात नोंदणी करणे अनिवार्य आहे.
3) आपल्या गावामध्ये बालविवाह होणार नाही यासाठी “माझे गाव, बालविवाह मुक्त गाव” हे अभियान राबविण्याचा आम्हीं ठराव संमत करत आहोत.