
सोशल मीडियात व्हायरल होणारे काही व्हिडीओ तोंडात बोटं घालायला लावतात. डोंबिवली शहरातील असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेंडमध्ये आहे. डोंबिवली शहरातील रस्ते व चौकांवर बर्फाची चादर पसरल्याचं यात दिसत आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी या पांढऱया शुभ्र दृश्याचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे. आपण युरोपातील एखाद्या शहराची सैर तर करत नाही ना, असा फील हा व्हिडीओ पाहणाऱयाला येतो. सगळं काही नेत्रसुखद वाटत असलं तरी हा व्हिडीओ खरा नाही. ‘एआय’ या नव्या तंत्रज्ञानाची ही कमाल आहे. हा व्हिडीओ तुम्हाला इथे पाहता येईल.
View this post on Instagram