लीलावती परिसरातील वाहतूककोंडीवर उपाय करा

वांद्रे आणि खार पश्चिम भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे लीलावती रुग्णालय परिसरात वाहतूककाsंडीची समस्या निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली.

लीलावती रुग्णालय ते खारदांडा या मार्गावर अरुंद रस्ते, रस्त्यावरच फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण, वाढती वाहनसंख्या आणि त्यांच्या पार्ंकगचा प्रश्न यामुळे प्रचंड वाहतूककाsंडी होत आहे. त्याचा मोठा फटका रुग्णालयात येणाऱया रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, लिंकिंग रोड, कार्टर रोड इत्यादी रस्ते एस. व्ही. रोडला येऊन मिळतात. बॅण्डस्टॅण्डकडे जाणाऱया या मार्गावर कायमच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. परंतु रस्ता अरुंद असल्याने गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग लक्षणीयरीत्या मंदावतो. अशातच वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत आहे. या समस्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यावर ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहाला सांगितले.