सोनिया गांधींविरोधात कर्नाटकात FIR दाखल

2602

एकीकडे संपूर्ण देश कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी झुंजत असताना दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडायला लागल्या आहेत. हे सगळं सुरु असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. प्रथम खबर अहवाल अर्थात FIR मध्ये आरोप करण्यात आला आहे की काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी यांच्याविरोधात आयपीसीच्या 153, 505 कलमांअंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. प्रवीण नावाच्या एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही FIR दाखल करण्यात आली आहे.

केंद्र सरकार राज्य सरकारांना सापत्न वागणूक देत असल्याचा म्हणत काँग्रेस मोदी सरकारवर टीका करते आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी निधी जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडाची माहिती सार्वजनिक करावी अशीही काँग्रेसने मागणी केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दोघांनी याच मुद्दावरून मोदी सरकारवर शरसंधान साधलं होतं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी वरचेवर संवाद साधला आहे. लवकरच देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचीही एक बैठक होणार असून त्यामध्ये कोरोना संकटाविषयी आणि सरकारने  केलेल्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेबाबत चर्चा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या