ही केवळ अफवाच! दीपा मलिकच्या बायोपिकवर सोनाक्षीचे स्पष्टीकरण

सामना ऑनलाईन, मुंबई

पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या दीपा मलिक हिच्या जीवनप्रवासावर आधारित बायोपिकमध्ये सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. सोनाक्षीने मात्र या बातमीचे खंडन केले आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिले आहे. स्ट्रीक्स प्रोफेशनलने रेट्रो रिमिक्स हेअर शो सादर केला. या शोमध्ये सोनाक्षी सहभागी झाली होती. त्यानंतर ती वृत्तसंस्थेशी बोलत होती.

या बायोपिकमध्ये तुला किती रस आहे असे विचारल्यावर ती म्हणाली, चांगल्या कथेवर आधारित सिनेमे आणि आव्हानात्मक भूमिका करायला मला नेहमीच आवडतात. याच वर्षी सोनाक्षीचे खानदानी शफाखाना, मिशन मंगल आणि दबंग 3 हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सोनाक्षीला बॉलीवूडमध्ये पदार्पण करून दहा वर्षे पूर्ण होत आहे. हा माझ्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सोनाक्षीने नमूद केले.