सोनाली कुलकर्णीचे लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवणार

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा विवाहसोहळा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार आहे. सोनालीचं लग्न कुणाल बेनोडेकर याच्याशी 7 मे 2021 रोजी झालं होतं. मात्र तेव्हा लॉकडाऊन असल्याने फार लोकांची या लग्नसोहळ्याला उपस्थिती नव्हती. यामुळे सोनाली आणि कुणाल यांनी लग्नाच्या वाढदिवशी लंडनमध्ये पुन्हा एकदा लग्न केलं होतं. हे लग्न साग्रसंगीत होतं आणि सगळ्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. सोनालीचा हा लग्न सोहळा प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार असून त्याची माहिती सोनालीने कू या अॅपवर केलेल्या पोस्टद्वारे दिली आहे.