ग्रुप ग्रामपंचायत कासुच्या सदस्यपदी सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड

9

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत कासुची निवडणूक येत्या 26 सप्टेंबर रोजी होणार असून या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मधुन शिवसेना काँग्रेस युतीच्या उमेदवार सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेना काँग्रेस युतीच्या विजयाचा श्री गणेशा झाला असून या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस युतीचा विजय निश्चित असल्याचा दावा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांनी केला.

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नरेश गावंड, वासुदेव म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. बिनविरोध निवड झालेल्या सोनाली पाटील यांचे नरेश गावंड, वासुदेव म्हात्रे, जयराज तांडेल, अजय तांडेल, राजन पाटील, शांताराम पाटील, वाय. डी. चौगुले यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या