वयाच्या 40व्या वर्षी सोनम कपूर होणार दुसऱ्यांदा आई

बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे कपूर आणि आहूजा कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे. सोनम लवकरच तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा करु शकते.

सोनम कपूर आणि तिचा नवरा आनंद आहूजा लग्नाच्या 7 वर्षानंतर दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. सोनम आणि आनंद यांना दुसऱ्यांदा बाळ होणार आहे. मात्र सोनमने याबाबत मौनच ठेवलेले आहे. लवकरच ती अधिकृतपणे पोस्ट शेअर करुन गुडन्यूज देऊ शकते.