बँकेत आपल्याच खात्यात जमा पैशांच्या सुरक्षेसाठी लवकरच प्रीमियम भरावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याच पैशांची लूट सुरू होण्याची शक्यता असून, आणखी एका विम्याचे टेन्शन डोक्यावर राहणार आहे. डीआयसीजीसीअंतर्गत बँकेत जमा पैशांवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा आहे. म्हणजेच बँक दिवाळखोरीत गेल्यास किंवा बंद झाल्यास आपल्या खात्यात जमा पैशांवर 5 लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते. ग्राहकांना हा विमा मोफत मिळतो; परंतु आता रिझर्व्ह बँकेने या विम्यावर प्रीमियम वसूल करण्याचे संकेत दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन यांनी एका कार्यक्रमात बँक खात्यात जमा पैशांवर प्रीमियम आकारला जाऊ शकतो, असे सांगितले. बँकेत जमा पैसेही जोखमीच्या व्यवहारात येतात. बँक दिवाळखोरीत निघाल्यास पैसे बुडतात. अशा वेळी त्यांना विमा संरक्षण मिळायला हवे. त्यादृष्टीने विचार सुरू असल्याचे स्वामीनाथन म्हणाले. याअंतर्गत विम्यात आणखी योगदान मिळू शकणार आहे.