तामीळ अभिनेत्री वनिता विजयकुमार ही कोरियोग्राफर रॉबर्ट राजसोबत लग्नगाठ बांधणार आहे. वनिताने नुकताच एक फोटो शेअर केला असून त्यात ती रॉबर्ट राजला प्रपोज करताना दिसत आहे. या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. येत्या 5 ऑक्टोबरला लग्न करणार असल्याची माहितीसुद्धा वनिताने आपल्या चाहत्यांना दिली आहे. वनिता लोकप्रिय अभिनेते विजयपुमार यांची मुलगी आहे, तर अरुण विजय याची ती सावत्र बहीण आहे.
वनिता हिची तीन लग्न झाली असून तिला तीन मुले आहेत. 2000 मध्ये पहिले लग्न अभिनेता आकाशसोबत केले होते. 2007 मध्ये वनिताने बिझनेसमन आनंद जय राजनसोबत दुसरे लग्न केले. 2020 मध्ये वनिता आणि पीटर पॉल यांनी सहमतीने घटस्फो घेतला.