मतदानासाठी हक्क विशेष नैमित्तिक रजा,पदवीधर-शिक्षक मतदारांसाठी गुड न्यूज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईसह ठाण्यात मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या ठिकाणी विधान परिषद मतदारसंघात २५ जून रोजी होणाऱया निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे.

निवडणुकीत पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतदारांना निवडणुकीच्या दिवशी पदवीधर-शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ही रजा जाहीर केली आहे असे कोकण विभागाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व उपायुक्त महेंद्र वारभुवन यांनी कळवले आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधान परिषद मतदारसंघांत २५ जून रोजी मतदान होईल, तर २८ जून रोजी मतमोजणी होईल.

मतदानाची वेळ वाढवली

या तीन मतदारसंघांत मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला असून मतदानाची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. २५ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.