
भरधाव बोलेरोने रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका बालकाचा समावेश आहे. घटनेची माहिती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली येथे हा भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की बोलेरोचा पूर्णपणे चक्काचूर झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सर्व जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.


























































