
राज्य शिक्षण मंडळाने नुकत्याच ऑनलाईन जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना येत्या सोमवार, 26 मे रोजी दिली जाणार आहे. 13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. आता परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेचे निकाल यांचे वाटप विभागीय मंडळांकडून 26 मे रोजी सकाळी 11 वाजता केले जाईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता शाळेत मुलांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल.