
लोकसभेपासून जनतेचा कौल आपल्या बाजूने आहे असे विधान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. तसेच चार राज्यांची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यासाठी कामाला लागा असे आदेशही गांधी यांनी दिले आहे.
काँग्रेसची संसदीय दलाची आज बैठक पार पडली. या बैठकीला सोनिया गांधी यांनी संबोधित केले. सोनिया गांधी म्हणाल्या की नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे. असे असले तरी मोदी सरकार देशात द्वेषाचे राजकारण करत आहे. काही महिन्यांतच चार राज्याच्या विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. लोकसभेत मिळालेल्या यशावर समाधान मानू नका. जनतेचा कौल आपल्या बाजूने आहे. लोकसभेत निर्माण झालेलं वातावरण आपल्याला कायम ठेवायचं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला एकत्र काम करायचे आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.
A moment of silence at the Central Hall, Parliament House, New Delhi, to pay respects to the lives lost in the Wayanad landslide and the three UPSC aspirants in Delhi who succumbed to flooding. pic.twitter.com/G0HpRDf3tW
— Congress (@INCIndia) July 31, 2024
केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्यावर सोनिया गांधी यांनी टीका केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की अर्थसंकल्पात तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या मागणीडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक क्षेत्रांना योग्य निधी न दिल्याने महत्त्वाच्या प्रकल्पांना न्याय देण्यात आलेला नाही असे गांधी म्हणाल्या.
The Modi government’s policies have failed to address the pressing concerns of farmers, youth, unemployment & price rise. pic.twitter.com/pA2crsG66i
— Congress (@INCIndia) July 31, 2024
The Modi government’s policies have failed to address the pressing concerns of farmers, youth, unemployment & price rise. pic.twitter.com/pA2crsG66i
— Congress (@INCIndia) July 31, 2024