महानगरपालिका निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी, असे आदेश निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची निवडणूक आयुक्तांनी आज ऑनलाईन बैठक घेतली. त्यात त्यांनी पुढील आदेश दिले.
– सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱयांची कार्यालये सुसज्ज ठेवावीत आणि मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करावे.
– निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागातील जागानिहाय आरक्षण, उमेदवारी अर्ज व शपथपत्राचे नमुने, इतर आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी, आवश्यक साहित्य इत्यादींची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.
– मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सेवा–सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
– शक्य असलेल्या ठिकाणी आदर्श मतदान पेंद्रे किंवा पिंक मतदान केंद्रांची उभारणी करावी.



























































