
वाहतूककोंडीच्या समस्येने त्रासलेल्या मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान आणि स्वस्त होणार आहे. मुंबई शहरात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन विभागाने बुधवारी घेतला. त्यानुसार पुढील दोन महिन्यांतच मुंबईच्या रस्त्यांवर बाईक टॅक्सी धावताना दिसणार आहेत.
शहरात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतुकीचे पर्याय अपुरे पडत आहेत. त्यातच वाहतूककाsंडीची मोठी समस्या आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्याची सूचना झा समितीने केली होती. त्यानुसार मुंबई शहरात रॅपिडो बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाईक टॅक्सीची सेवा सुरू करताना महिला सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली जाईल. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणे बंधनकारक असेल. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक टॅक्सीला मंजुरी दिल्याचे जाहीर करताना ही माहिती दिली.