
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा तालिका अध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन देशमुख तर विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी सुनील शिंदे यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. त्यात शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यासह अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुणावार, समाधान अवताडे या आमदारांचा समावेश आहे.
विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे अमित गोरखे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जगदीश नायकवडी, शिंदे गटाचे कृपाल तृमाने, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांची ओळख करून दिली.