
देशाचे आर्थिक बजेट 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केले जाणार आहे. त्याआधीच शेअर बाजार कोसळला. या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 297 अंकांनी घसरून 82,269 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 98 अंकांनी घसरून 25,320 अंकांवर बंद झाला. यासोबतच शेअर बाजारातील मागील तीन दिवसांच्या लागोपाठ वेगाने वाढणाऱ्या शेअर बाजाराला ब्रेक लागला. रविवार, 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. त्याआधीच गुंतवणूकदार अलर्ट झाले आहेत. जागतिक स्तरावर मिळणाऱ्या संकेतामुळे अनेकांनी शेअर बाजारातील शेअर्स विक्रीला काढले. शेअर बाजाराचा व्यवहार सुरू असताना एकवेळ अशी आली की, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, परंतु नंतर काही निवडक शेअर्समध्ये चांगली खरेदीदारी झाल्याने ही नुकसानभरपाई निघाली.
सेन्सेक्समधील अन्य 17 पंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्यामध्ये टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, इंडिगो, इटरनल, एनटीपीसी, टीसीएस, एचडीएफसी बँक, ट्रेंट, कोटक बँक, अल्ट्रा सिमेंट कंपनी, बजाज फिनसर्व आदींचा समावेश आहे.
बडोदा बीएनपी फंड
बडोदा बीएनपी परिबा मनी मार्पेट फंडाने सहाव्या वर्धापन दिन साजरा करताना यशाचा दुहेरी टप्पा गाठला आहे. फंडाच्या व्यवस्थापनाअंर्तगतचा निधी मासिक पातळीवर तब्बल साडेचार हजार कोटी रुपयांवर पोहचला आहे.
इन्पहसिस सहकार्य
n इन्पहसिस कंपनीने उद्योगांमध्ये जनरेटिव्ह एआयचा अवलंब वेगाने वाढवण्यासाठी अॅमेझॉन वेब सर्विसेस (एडब्ल्यूएस) सोबत धोरणात्मक सहकार्य जाहीर केले. असे अॅमेझोनचे संदीप दत्ता म्हणाले.
सूर्यदयो फायनान्स
n सूर्यदयो स्मॉल फायनान्स बँकेने गोल्ड लोन व्यवसायात प्रवेश केला. याअंतर्गत सुरक्षित कर्जवाढ धोरणाअंतर्गत देशभर टप्प्याटप्प्याने विस्तार करणार आहे. या सेवेची सुरुवात महाराष्ट्रातून करण्यात आली असून पुढे इतर राज्यांमध्ये करण्यात येणार आहे.
‘पेपरफ्राय’चा रिपोर्ट
n ‘पेपरफ्राय’ने ’होम रिपोर्ट कार्ड 2025’ प्रसिद्ध केले आहे. या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यावेळी पेपरफ्रायचे सह-संस्थापक आशीष शाह उपस्थित होते. ग्राहक आपले संपूर्ण घर एकाच वेळी सजवण्याऐवजी वर्षभरात सजवण्यावर भर देत आहेत.
एम्बेसी डेव्हलपमेंट्सचा मुंबईत विस्तार
n एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेड मुंबई महानगर प्रदेशमध्ये विस्तार जाहीर केला. या धोरणात्मक विस्ताराचा भाग म्हणून ईडीएल वरळी, जुहू आणि अलिबागमध्ये तीन प्रमुख निवासी प्रकल्प बांधणार आहे. यासाठी जवळपास 4,500 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या तीन प्रकल्पांचा एकत्रित एपूण विकास मूल्य 12,000 कोटींहून अधिक असून, एपूण विकास क्षेत्र सुमारे 1.58 दशलक्ष चौरस फूट आहे. हे प्रकल्प आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीत सुरू करण्याचे नियोजन आहे असे एम्बेसी डेव्हलपमेंट्सचे अध्यक्ष जीतू विरवानी यांनी म्हटले आहे.
महाराजाची स्वामी आणि सुखड चंदन अगरबत्ती बाजारात
n महाराजा अगरबत्तीची स्वामी आणि सुखड चंदन प्युअर ब्रॅण्डची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. तसेच केसरिया उद, केसरिया चंदन, मिस्टिक रोझस टॅपल ब्लिस, रॉयल उद, हिना, पानडी, सुखद सँडल, पल्सर,बेला, का@न्फिडंट, ड्रीम, लव्हेंडर, सँडलवुड, स्वामी, ग्रीन मस्क, कश्मिरी लव्हेंडर, अंगारे उद, कस्तुरी आणि अनमोल अशा प्रकारातील उत्तम सुगंधी अगरबत्त्या महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्प रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. 8369185071 वर संपर्प साधा.
इंडियामार्टच्या नफ्यात 13 टक्के वाढ
n इंडियामार्टने व्यवसायातील एकत्रित उत्पन्न 402 कोटी असल्याचे जाहीर केले असून नफ्यात 13 टक्के वाढ नोंदवली आहे. इंडियामार्टचे स्वतंत्र उत्पन्न 368 कोटी असून मागील वर्षाच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच बिझी इन्पह्टेकचे महसुली उत्पन्न 32 कोटी इतके आहे. डिसेंबर 2025 नुसार विस्थगित महसूल हा 1775 कोटींपर्यंत वाढला आहे.
करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
n बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती करिष्मा अंगारे ऊद आणि हिमालय कस्तुरी नॅचरल बेस अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. संपर्प – 9343834805.
अॅरोकेम रतलामचा परफ्युम बाजारात
n अॅरोकेम रतलाम प्रा. लि. ने हीना नावाचे रोल ऑन (परफ्युम) नवीन पॅकमध्ये बाजारात विक्रीसाठी आणले आहे. या अत्तराचा सुगंध बराच वेळ दरवळत राहतो व वातावरण प्रफुल्लीत करतो. हे हीना रोल्स ऑन परफ्युम 2 मिली, 6 मिली, 25 मिली, 100, 1 किलो आणि 5 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. संपर्प – 07412-236226.




























































