Share Market News – शेअर बाजार सोमवारी क्रॅश, मंगळवारी बनला रॉकेट; अद्याप दबाव कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाल्यानंतर बाजारात मंगळवारी तेजी दिसून आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे ही तेजी आली. बीएसई सेन्सेक्स 1500 अंकांच्या उसळीने उघडला, तर एनएसई निफ्टीमध्ये 200 हून अधिक अंकांची वाढ झाली.

सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीतून सावरत मुंबई आणि राष्ट्रीय दोन्ही निर्देशांकांनी जोरदार वाढीसह सुरुवात केली. मुंबई शअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स उघडताच १,५०० हून अधिक अंकांनी उसळी घेत ७४,००० चा टप्पा ओलांडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीसुद्धा मागील बंद भावापेक्षा अधिक वेगाने उघडला आणि २३,००० च्या जवळपास व्यवहार करत होता. शेअर बाजार तेजीत असला तरी त्यावर दबाव कायम आहे.

बाजाराने तेजीत सुरूवात केली असली तरी खरेदीचा सपाटा सुरू असल्याने बाजारावर दबाव कायम आहे. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 407.96 अंकांच्या म्हणजेच 0.56% वाढीसह 73,104.35 वर व्यवहर करत होता. तर निफ्टी 121.35 अंकांच्या म्हणजेच 0.54% वाढीसह 22,634 . 85 वर व्यवहार करत होता. त्यामुळे बाजारावर दबाव असल्याचे दिसत आहे.

शेअर बाजारातील ही अचानक आलेली तेजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधामुळे आहे. त्यांनी इराण युद्धासंदर्भात एक विधान केले, ज्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी आली. परदेशातून मिळालेल्या सकारात्मक संकेताचाही सेन्सेक्स आणि निफ्टीच्या तेजीवर थेट परिणाम झाला.

सोमवारी शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. मध्य-पूर्वेतील युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे सुरुवातीपासूनच घसरलेले सेन्सेक्स आणि निफ्टी शेवटपर्यंत घसरत राहिले. बाजार बंद होताना, बीएसई सेन्सेक्स १,८३६ अंकांनी घसरून ७२,६९६ वर बंद झाला, तर निफ्टी ६०१ अंकांनी घसरून २२,५१२ वर बंद झाला. या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एकाच दिवसात १२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले.