
हिंदुस्थानी शेअर बाजार बुधवारी चांगलाच उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 304 अंकांनी उसळून 80,539 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 131 अंकांनी उसळून 24,619 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजार उसळल्याने गुंतणूकदारांनी अवघ्या एका दिवसात 2 लाख कोटी रुपयांची कमाई केली. एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 443 लाख कोटींवरून 445 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. अपोलो हॉस्पिटल्स, हिंडाल्को इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज लॅब्स, सिप्लाचे शेअर्स वाढले, तर इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्टस्, टायटन कंपनी, आयटीसीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. दरम्यान, शेअर बाजार उसळल्यासोबत हिंदुस्थानी रुपयांमध्येही आज चांगली वाढ झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी मजबूत होऊन 87.43 वर बंद झाला.